भारत विरुद्ध पाकिस्तान: एवढे रुपये मोजावे लागणार ३० सेकंदांच्या जाहिरातीसाठी

भारत विरुद्ध पाकिस्तान या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याकडे क्रिकेटप्रेमी डोळा लावून बसले आहेत. २०११ च्या मोहालीमध्ये झालेल्या उपांत्यफेरीनंतर पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट सामन्याची एवढी चर्चा होत आहे.

यामुळे सहाजिकच सामन्यादरम्यान टेलिव्हिजन जाहिरातीचे रेटही खूपच मोठे आहेत. करोडो चाहते हा सामना पाहणार असल्यामुळे नेहमीपेक्षा १०पट जास्त रेट हे यावेळी जाहिरातीसाठी आकारले जाणार आहेत.

बातम्यांनुसार ३० सेकंदाच्या जाहिरातीसाठी तब्बल १० मिलियन रुपये ($१५५,२६७) एवढी मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. भारतात साधारणपणे टेलिव्हिजन शो किंवा भारताच्या सामन्यासाठी ३० सेकंदांसाठी १ मिलियन रुपये घेतले जातात. त्याच्या ही रक्कम १० पट जास्त आहे.

यातील जाहिरातीचे बरेच स्पॉट हे आधीच निस्सान मोटर, इंटेल कॉर्प, इमिरेट्स, ओप्पो आणि एमआरएफ सारख्या कंपन्यांनी विकत घेतले आहेत. या कंपन्या याआधीच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कमर्शिअल पार्टनर्स आहेत.

जेमेतेम १० टक्के स्पॉट हे आता शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे.

जगात सहा टेलिव्हिजनवर सार्वधिक गेलेल्या सामन्यात २०१५ क्रिकेट विश्वचषक लढतीचा समावेश आहे. अन्य टेलिव्हिजनवर सार्वधिक पाहिलेल्या लढतीमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना, उसेन बोल्टची २०१२ मधील १००मी धावण्याची लढत यांचा समावेश आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी सामन्यात जेव्हा भारत पाकिस्तान आमने सामने आले होते ती लढत जवळजवळ २०० मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पहिली होती. अंतिम सामन्यात त्यात ३० ते ४०% वाढ होण्याची शक्यता आहे.