जेव्हा विराट कोहली देतो शिवी आणि स्टंप माइकमध्ये होते रेकॉर्ड!

मुंबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल सामन्यादरम्यान शिवी दिलेली माइकमध्ये रेकॉर्ड झाली. नंतर सोशल मीडियावर अनेक नेटिझन्सने याचा विडिओ चांगलाच शेअर केला.

जेव्हा २३ व्या षटकात विराट आणि विजय हे फलंदाजी करत होते तेव्हा विराट कोहलीने विजयला संयमी खेळी करायला सांगताना हे शब्द वापरले. विराट जेव्हा फलंदाजी करत असतो तेव्हा तो सतत आपल्या जोडीदाराशी संवाद साधून आत्मविश्वास देत असतो.

जेव्हा सामना आशिया खंडाबाहेर असतो तेव्हा विराटही एमएस धोनीसारखा संघातील अन्य खेळाडूंशी हिंदीमध्ये संवाद साधतो. काल जेव्हा भारतीय संघ संकटात होता तेव्हा विराट सतत समोरच्या भारतीय संघातील खेळाडूंना पाठिंबा देऊन त्यांचा सर्वोत्तम देण्यासाठी प्रोत्साहित करत होता.

कालही त्याने मुरली विजयशी संवाद साधताना “बहुत बढ़िया, अगर शाम तक खेलेंगे तो इनकी …… फट जाएगी।” असे शब्द वापरले. परंतु यासाठी विराटला सोशल माध्यमांवर लक्ष करण्यात आले नाही. कारण विराटने या सामन्यात अशी काही फलंदाजी केली आहे जी अन्य कोणत्याही खेळाडूला जमली नाही.

आज विराटने कसोटी कारकिर्दीतील २१ वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५३वे शतक केले आहे.