रोहित शर्माचा तिसरा कसोटी सामना शेवटचा असेल तरच मिळेल संधी, ट्विटरवर ट्रोल

सेंच्युरियन ।भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या सामन्यातही सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला ट्विटरवर जोरदार ट्रोल केले जात आहे. रोहित शर्माने जर तिसरा सामना हा आपला कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना आहे असे सांगितले तरच त्याला संधी दिली जाईल असंही एका चाहत्याने गमतीने लिहिलं आहे.

रोहितची परदेशातील कसोटीमधील कामगिरी पाहता कर्णधार कोहली कमीतकमी दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देईल असे बोलले जात होते. परंतु कर्णधाराने तसे न करता रोहित शर्मावर विश्वास कायम ठेवत त्याला संधी दिली. या संधीचे मात्र या मुंबईकर खेळाडूला सोने करता आले नाही. त्यामुळे या कसोटी सामन्यात रोहित हा बाकी खेळाडूंपेक्षा जास्त चर्चेचा आणि टीकेचा विषय झाला आहे.

रोहितला जर भारतीय कसोटी संघात आपले स्थान कायम करायचे असेल तर दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात त्याला नक्कीच मोठी कामगिरी करावी लागणार आहे, नाहीतर वनडेत ३००हुन अधिक सामने खेळलेल्या युवराजला कसोटीत जेमेतेम ४० कसोटी सामने खेळायला मिळाले असंच काहीतरी रोहित बाबतीतही पाहायला मिळू शकत.