शिखर धवनला कायमच बळीचा बकरा बनवलं जात; एक माजी क्रिकेटपटूच स्पष्ट मत

0 259

सेंचुरियन । पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. यातील सर्वात पहिला बदल म्हणजे शिखर धवनच्या जागी केएल राहुलला दिलेली संधी.

याबद्दल माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी थेट नाराजगी केली आहे. शिखर धवनला कायम बळीचा बकरा बनवण्यात येत. एक सामना खराब खेळल्यावर त्याला संघातून काढून टाकण्यात आलं. हे काय होतंय हे समजत नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच केपटाउन कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला संघात कायम ठेवायला हवं होत. बुमराह किंवा शमीच्या जागी इशांत शर्माला संधी द्यायला हवी होती.

संघातून भुवनेश्वर कुमारला वगळल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड यांनाही नाराजी व्यक्त केली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: