डीआरएसमध्ये दिलरुवान परेराच्या मदतीला ड्रेसिंग रूम, अखिलाडूवृत्तीचा कळस

कोलकाता । फेक फिल्डिंग प्रकारानंतर श्रीलंका संघ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी जेव्हा डीआरएसची मागणी श्रीलंकेच्या फलंदाजाने केली तेव्हा त्याला ड्रेसिंग रूममधून इशारे आले असल्याचे समोर आले आहे.

५७व्या षटकांत जेव्हा मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर दिलरुवान परेराला पंच निजल लॉन्ग यांनी एलबीड्ब्लु पद्धतीने बाद दिले तेव्हा तो ड्रेसिंग रूमकडे जाऊ लागला परंतु अचानक मधेच थांबून त्याने डीआरएसची मागणी केली. त्यावेळी त्याला ड्रेसिंग रूममधून काही इशारे आल्यामुळेच त्याने ही कृती केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डीआरएसमध्ये चेंडू स्टंपपासून दूर जात असल्यामुळे त्याला नाबाद देण्यात आले. नियमाप्रमाणे मैदानावरील खेळाडू डीआरएस घेऊ शकतो परंतु त्याला त्यावेळी ड्रेसिंग रूममधील कुणाची मदत घेता येत नाही. तसेच डीआरएस घेताना तो ठराविक सेकंदातच घेता येतो.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा: Click