- Advertisement -

म्हणून कुलदीप यादवला मिळणार उद्या संधी !

0 38

पल्लेकल: उद्यापासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे

आज झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने याबाबत संकेत दिले. धरमशाला येथे पहिली आणि शेवटची कसोटी खेळलेला कुलदीप यादव हा एक उत्तम गोलंदाज असून कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याला मोठी संधी असल्याचं कोहलीने म्हटले आहे.

कुलदीप यादव भारताकडून १ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळला असून त्याने कसोटीत ४ तर एकदिवसीय सामन्यात ८ बळी मिळवले आहेत.

Comments
Loading...
%d bloggers like this: