एकमेव टी -२० जिंकून भारताला संपूर्ण श्रीलंका दौऱ्यावर निर्भेळ यश मिळवण्याची संधी !

श्रीलंका संघ सध्या खूप अवघड परिस्थितीतून जात आहे. झिम्बाब्वे मालिकेत मिळालेली हार व त्यानंतर भारताविरुद्धच्या कसोटी व वनडे दोनही मालिकेत एकही विजय न मिळणे ही या संघासाठी लाजिरवाणी गोष्ट ठरली आहे. आता जर श्रीलंकेला भारताला संपूर्ण दौऱ्यात निर्भेळ यश मिळवण्यापासून वाचवायचे असेल तर त्यानं आज होणाऱ्या एकमेव टी-२० मध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.

तस बघायला गेलं तर श्रीलंकेसाठी भारताला कसोटी किंवा वनडेपेक्षा टी-२०मध्ये हरवणे सोपे असेल. भारताने मागील ४ सामन्यांपैकी दोन टी-२० सामने हरले आहेत. हरलेल्या दोन सामन्यांपैकी १ सामना भारताने टी-२० विश्वचषक विजेते वेस्ट इंडिजशी खेळला होता.

कमीत कमी कागदावर तरी श्रीलंकेचा संघ या टी-२० फॉरमॅटसाठी सक्षम दिसत आहे. निरोशन डिकवेलला वनडेमध्येही टी-२० प्रमाणेच खेळतो. त्याच बरोबर श्रीलंकेच्या संघात चांगले फिरकी गोलंदाजही आहेत. तसेच आता वयस्कर झालेला लसिथ मलिंगा ही चार षटके उत्तम रित्या टाकण्याची धमक ठेवतो.

खास विक्रम: भारत जर या मालिकेत शेवटचा एकमेव टी२० सामना जिंकला तर एका मालिकेत किंवा एका दौऱ्यावर सार्वधिक सामने जिंकून निर्भेळ यश मिळविण्याच्या विक्रमाची भारत बरोबरी करणार आहे. यापूर्वी आस्ट्रेलियाने पाकिस्तानला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ९-० असे हरवले होते. भारताला आता केवळ एका विजयची गरज आहे.

मागील सामन्यातील कामगिरी

श्रीलंका: हार, विजय, हार, विजय, विजय.

भारत: हार, विजय,विजय, हार, हार.

स्पॉटलाईट मधील खेळाडू

लसिथ मलिंगा: ६७ टी-२० सामन्यात १९.६५ च्या सरासरीने ८९ विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगा जरी आता वयस्कर झाला असला तरी त्याच्याशिवाय आतातरी श्रीलंकेकडे पर्याय नाही. श्रीलंकेच्या बाकी युवा खेळाडूंनी ही चांगली कामगिरी केली आहे पण त्यांच्या गोलंदाजीमध्ये अनुभवाची कमी दिसून येते.

जसप्रीत बुमरा: दुसरीकडे भारताच्या युवा यॉर्कर स्पेशालिस्ट आणि लसिथ मलिंगचा शिष्य असेला जसप्रीत बुमराकडून भारताला विशेष कामगिरीची अपेक्षा असेल. आतापर्यंत जसप्रितने २४ सामन्यात १७.७८ सरासरीने ३३ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराने आपल्या गुरुप्रमाणेच यष्टीभेदी यॉर्कर टाकण्याची कला आत्मसात केली आहे. डावाच्या शेवटच्या षटकात त्याच्या गोलंदाजी विरुद्ध फटकेबाजी करणे फलंदाजांना अशक्य झाले आहे.

संभाव्य संघ यातून निवडला जाईल

श्रीलंका: निरोशन डिकेवेल, उपुल थरंगा (कर्णधार), दिलशान मुनावीरा, अँजेलो मॅथ्यूज, सिरीवाडाना शिवार्डना, सेकुगु प्रसन्ना, थिसारा परेरा, जेफ्री वांडरसे, लक्ष्मल परामर्श, लसिथ मलिंगा, विकम संजय, उदाना इश्यु, वाइडस्क्रीन स्टेशन, दसन शानाका, अकिला दानंजय.

भारत: विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, मनीष पांडे, हरदीप पंड्या, अक्रम पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बूमरा, यज्वेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, केदार जाधव.

खेळपट्टीचा अनुमान: आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो हे साधारणतः टी-२० साठी गोलंदाजना अनुकूल असे मैदान आहे, या मैदानावर सरासरी १६० धावा केल्या जातात. पावसाची दाट शक्यता आहे.