हेराथला मुकावा लागणार तिसरा कसोटी सामना

श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज आणि पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवणारा रंगना हेराथ तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला मुकणार आहे. पाठीच्या दुखापतीमुळे हेराथला या सामन्यात खेळता येणार नाही. सध्या श्रीलंकेच्या फिरकीचा कणा असणाऱ्या हेराथला बाहेर बसावे लागल्यामुळे श्रीलंकेची चांगलीच धांदल उडाली आहे.

असेला गुणरत्ने, नुवान प्रदीप, सुरंगा लकमल पाठोपाठ आता हेराथ देखील या यादीत म्हणेजच दुखापत ग्रस्तांच्या यादीत जाऊन बसला आहे. आता अश्या परिस्थितीत श्रीलंका काय पाऊल उचलते हे पहाणे महत्वाचे ठरेल. गॉलच्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या कसोटीत हेराथ खेळेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती मात्र त्याला फिट घोषित करण्यात आले होते. हेराथच्या नावे ३८९ कसोटी बळींचा समावेश आहे.

रंगना हेराथच्या ऐवजी वेगवान गोलंदाज दुशमंत चामीराला संघात संधी मिळू शकते.