जेव्हा विराट कोहली भेटतो बलाढ्य कुस्तीपटू ‘द ग्रेट खलीला’ !!

रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने श्रीलंकेवर ५३ धावांनी विजय मिळवला. पत्रकार परिषदेनंतर विराट कोहलीने प्रमुख अतिथीची भेट घेतली ती म्हणजे ‘माजी कुस्तीपटू द ग्रेट खली’.

कोहलीने त्याच्या बरोबरचे दोन फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत यामध्ये तो म्हणाला खलीला भेटून खूप छान वाटले काय माणूस आहे तो! यावर ट्विटवर विराटच्या चाहत्यांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

द ग्रेट खली ‘डब्ल्यूडब्लूई’ मधील अनेक द्वदंयुद्ध खेळला असून भारताचा तो पहिला कुस्तीपटू आहे ज्याने जागतिक स्तरावर खूप मोठी कामगिरी केली.
विराटने विजय मिळ्वण्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की भारतीय संघाला विजय मिळवण्याची एक आवड निर्माण झालिये, याआधी आम्ही २०१५ झालेल्या कसोटी मालिकेत २-१ अश्या फरकाने विजय मिळवला होता, आता १२ तारखेला पल्लेकेल येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याची आम्हाला संधी आहे.

“दुसरी कसोटी जिंकण्याचा आम्हाला आनंदच आहे अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर सामना घरच्या मैदानावर असो की बाहेर हे आम्ही पाहत नाही फक्त संघाला कसा विजय मिळवता येईल यावर आमचे लक्ष असते मग सामना कुठेही असो.”

“आम्ही आमच्या क्षमतेनुसार कसलीही चिंता न करता खेळत राहू आणि संपूर्ण भारतीय संघाला याची जाणीव निर्माण झाली आहे आणि यामुळेच आम्ही उत्तरोत्तर चांगली कामगिरी करू दाखवू, मला वाटते भारतीय संघाला विजय मिळवण्याची आवड निर्माण झालीये व आम्ही भविष्यात सुद्धा राखण्याचा प्रयत्न करू आणि भारतीय संघात ती क्षमता आहे.”

उद्धव प्रभू ( टीम महा स्पोर्ट्स )

 

पहा विराटच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया:

https://twitter.com/Viratholic18/status/894228667118665731