तिसरी कसोटी: आजच्या दिवसातील कसोटीतील हे ५ विश्वविक्रम

दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडत ९ बाद ३५६ अशी अवस्था केली आहे.

श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने शतकी खेळी करताना २६८ चेंडूत १११ धावा केल्या आहेत तर कर्णधार चंडिमल ३४१ चेंडूत १४७ धावांवर खेळत आहे.

आजच्या सामन्यात श्रीलंका संघाने पूर्ण दिवस फलंदाजी करताना केलेले विक्रम-

-यावर्षी दिनेश चंडिमल तीनवेळा एका डावात ३०० पेक्षा जास्त चेंडू खेळला आहे. यावर्षी अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू. बांगलादेश (३०० चेंडूत १३८ धावा), पाकिस्तान(३७२ चेंडूत नाबाद १५५ धावा) आणि भारत (३४१ चेंडूत नाबाद १४७ धावा)

-भारतात कसोटी सामन्यात दोन्ही संघाच्या कर्णधारांनी शतकी खेळी करायची ७वी वेळ. विराट आणि धोनी यांच्याबरोबर कर्णधार असताना दोनवेळा हा योग्य जुळून आला. विराट बरोबर बांग्लादेशच्या मुशाफीकुर रहीम आणि सध्या सुरु असलेल्या सामन्यात विराट आणि चंडिमल यांनी आपल्या संघासाठी शतके केली आहेत.

-श्रीलंकेकडून कसोटीत सर्वात कमी डावात १० शतके करणारा चंडिमल पहिला खेळाडू. ८० डावात केली १० शतके. पूर्वीचा ८४ डावात १० शतकांचा समरवीराचा विक्रम मोडला.

-मॅथ्यूजने तब्बल १९ कसोटीनंतर आणि २ वर्षांनी शतकी खेळी केली आहे. त्याचे हे कसोटीतील ८वे शतक आहे.

-२०१७मध्ये भारताकडून कसोटीत श्रीलंका संघाविरुद्ध १४ शतके ठोकली गेली तर श्रीलंकेने यावर्षी भारताविरुद्ध जी दोन शतके केली ती आजच्या सामन्यात चंडिमल आणि मॅथ्यूजने केली आहेत.