विंडीजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात एका न्यू टीममेटचा समावेश

भारतीय संघ सध्या विंडिज सोबत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघात एका नविन सदस्याची वर्णी लागली आहे. कोण आहे हा ‘न्यू टीममेट’?  बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून या नविन भारतीय संघातील सदस्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आपल्याला या नविन सदस्याबद्दल जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता लागली असणार आहे. ह्या नविन भारतीय संघ सहकाऱ्याला संघ व्यवस्थापनाने हैद्राबाद येथे होणाऱ्या विंडिजविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाच्या सराव सत्रात सामील केले आहे. हा टीममेट बाकी कोणी नसून क्षेत्ररक्षण सरावासाठी वापरण्यात येणारे मशीन आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ” संघातील नवीन सदस्य हा भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण सरावातील सहाय्यक असेल. गोलंदाजीच्या मशीनचे हे लहान प्रारूप आहे.”

“ही मशीन झेल घेण्यासाठीच्या सरावासाठी उपयुक्त आहे. स्लिप क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला या मशीनने सराव दिला जातो. स्लिपमधील झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षकाकडे खूपच कमी वेळ उपलब्ध असतो” असे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आर श्रीधर यांनी सांगितले.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि नवोदित पृथ्वी शाॅ सराव करताना दिसत आहेत.

या मशिनमध्ये आपण गती निर्धारीत करू शकतो. लडखडत जाणारे चेंडू तसेच स्पिन चेंडूची व्यवस्था या मशिनमध्ये देण्यात आली आहे. याचा वापर अफगाणिस्तानविरूद्धच्या कसोटी पूर्वी तसेच इंग्लड दौऱ्यात केला होता, असेही श्रीधर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-