पृथ्वी शाॅच्या शतकाने त्याच्या मानपूर या मुळ गावी आनंदोत्सव

भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना कालपासून (4 ऑक्टोबर) राजकोट येथे सुरू झाला. त्या सामन्यात भारतीय कसोटी संघाकडून पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शाॅच्या घरी मोठा जल्लोष करण्यात आला आहे. पृथ्वी शाॅच्या मुळ गावी म्हणजे मानपूरमधील (जिल्हा गया, बिहार )आजोबाच्या घरी दिवाळीसारखेच चित्र आहे.

मानपूर हे हातमाग उद्योग आणि रेल्वे कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. पृथ्वीने शतक केल्यानंतर त्याचे नातेवाईक, शेजारी आणि मित्र सगळे धावत त्याच्या आजोबाच्या घरी आले होते. फाल्गु नदीच्या काठी वसलेल्या या शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पृथ्वी शाॅ ह्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार असल्याने त्याच्या गावी सर्वजण टिव्ही समोर बसले होते. जेव्हा पृथ्वी शाॅ मैदानाकडे चालत जात होता, त्यावेळी तेथे एकच जल्लोष करण्यात आला होता.

जेव्हा त्याने शतकी धाव घेतली त्यावेळी त्याचे अजोबा अशोक शाॅ यांच्या घरी ‘टीम इंडिया जिंदाबाद,’ ‘पृथ्वी शाॅ जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

”पृथ्वीच्या शतकाने आम्हाला अतिशय आनंद झाला असून, हा दिवस आमच्यासाठी दिवाळी पेक्षा कमी नाही. आमचा मुलगा मानपूरचे नाव मोठे करत करत आहे,” पृथ्वीच्या नातेवाईक ज्योती देवी शाॅ यांनी सांगितले.

पृथ्वीचे आजोबा अशोक शाॅ म्हणाले की ”पृथ्वी बालपणापासून मेहनत घेत आहे. प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करत असून त्याचे कौतुक करत आहे. त्याच्या वडीलांनी  देखील त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून पृथ्वीने हे यश मिळवले आहे”.

महत्वाच्या बातम्या-