थेट मैदानात जाऊनच त्या चाहत्याने घेतला रनमशीन विराट सोबत सेल्फी

भारत आणि विंडिज यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकोट येथील मैदानावर होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जिथे सामना असेल तेथे चाहते गर्दी करत असतात.

राजकोट येथील सामन्यादरम्यान दोन चाहत्यांनी विराट सोबत सेल्फी काढण्यासाठी चक्क सामन्यादरम्यान पीचवर धाव घेतली. सुरक्षा रक्षकांना चकवीत त्यांनी थेट मैदानात प्रवेश केला होता. कोहली त्यांना काहीतरी बोलत असताना त्यांनी सेल्फी काढला. नंतर त्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी मैदानाच्या बाहेर नेले.

कोहलीच्या चाहत्याने मैदानावर धाव घेण्याची ही पहिली वेळ नाही. ह्याच वर्षी आयपीएलमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर एका चाहत्यांने सुरक्षारक्षकांना चकवा दिला होता. त्याने मैदानात जाऊन कोहलीच्या पायावर लोंटांगण घेतले होते.

या सामन्यात फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. पृथ्वी शाॅने पदार्पणातच शतक ठोकले आहे.पहिल्याच दिवशी तर आज विराट आणि जडेजाने शतकी कामगिरी केली.

महत्वाच्या बातम्या-