खेळपट्टीचा अंदाज पाहून जेसन होल्डरचा प्रथम फलंदाजीची निर्णय

भारत आणि विंडिज यांंच्यात आजपासून हैद्राबाद येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. विंडिजच्या संघाचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरची खेळपट्टी ही फलंदाजीला साथ देणारी असणार आहे, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे जेसन होल्डरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

या सामन्यासाठी विंडिजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कर्णधार जेसन होल्डर आणि जोमेल वॅरिकन यांना अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे. किमो पाॅल आणि शेरमन लुईस यांना बाहेर बसवण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज कीमार रोचला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळालेली नाही.

भारतीय संघात देखील एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला बाकावर बसवून शार्दुल ठाकूरला भारतीय कसोटी संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

विंडिजचा संघ-

क्रेग ब्रेथवाइट, कियरन पॉवेल, शाई होप, शिमोन हेटमायर, सुनील अॅंब्रिस, रोस्टन चेस, शेन डोवरीच (यष्टीरक्षक), जेसन होल्डर (कर्णधार), देवेंद्र बिशू, जोमेल वॉरिकन, शॅनन गेब्रियल

भारतीय संघ-

पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, शार्दुल ठाकूर

महत्वाच्या बातम्या-