क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना मोठा धक्का! वानखेडेवरील मॅच संदर्भात होऊ शकतो मोठा निर्णय

29 आॅक्टोबरला होणारा भारत आणि विंडिज यांच्यातील चौथा वन-डे सामना वानखेडे मैदानावर आयोजित करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामध्ये नविन धोरणामुळे तिकीट विक्रेते मिळाले नाहीत. काॅमल्पीमेंटरी पास हा देखील आणखी एक वादाचा मुद्दा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नविन घटनेनुसार सामन्यांच्या टिकीटांपैकी 90 टक्के तिकट हे विकण्यासाठी ठेवायचे तर 10 टक्के तिकट हे काॅमल्पीमेंटरी पास म्हणून देण्याचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरत आहे.

या निर्णयामुळे बीसीसीआय आणि तिच्या राज्य संघटनामध्ये वाद निर्माण होत आहेत.

मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने इंदोर येथे होणाऱ्या भारत आणि  विंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या मालिकेतील वन-डे सामन्याचे प्रायोजकत्व नाकारले आहे.

मुंबई क्रिकेट संघटनेकडून बीसीसीआयचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जोहरी यांची भेट घेऊन बीसीसीआयलाच हा सामना वानखेडे मैदानावर आयोजित करण्याची विनंती केली आहे. जोहरी यांनी यावर  काहीही प्रतिक्रीया न देता गुरवारी  पुन्हा बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.

”आम्ही आमच्या वेंडरला पैसे देऊ शकत नाही. आम्ही बीसीसीआयलाच हा सामना आयोजीत करण्याची विनंती केली आहे.” असे एमसीएच्या काही सुत्रांनी सांगितले.

“आम्ही जोहरी यांना काॅमल्पीमेंटरी पासेसच्या संबधी असणाऱ्या समस्या देखील मांडल्या आहेत. आम्हाला 330 क्लब सदस्यांना प्रत्येकी चार पासेस द्यावे लागतात. त्याशिवाय सामना आयोजित करण्यासाठी ज्या सरकारी संस्थांची मदत होते. त्यांना देखील पास द्यावे लागतात.” असेही याच सुत्रांनी पुढे सांगितले.

एमसीएला सध्या कुणीही अध्यक्ष किंवा सचिव नसल्यामुळे विजय हजारे ट्राॅफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या हाॅटेलचे पैसेही देण्यात आले नव्हते. हे पैसे बीसीसीआयने द्यावे असी विनंती एमएसीएकडून करण्यात आली होती.

विविध राज्यातील क्रिकेट संघटनांनी विरोध केल्यानंतरही प्रशासकीय समितीकडून एमसीएला आणखी 600 पास देण्यात आले आहेत. संघटनेला फक्त 5 टक्के टिकीट मिळतात. मिळणाऱ्या पासेसची सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी लागते.

महत्वाच्या बातम्या-