धोनीच्या नावावर ‘नकोसा’ असा विक्रम

भारताच्या यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीच्या नावावर आजपर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये असंख्य विक्रम जमा असले तरी या माजी कर्णधारच्या नावे एक नकोसा असा विक्रम झाला आहे. भारतासाठी २००१ सालानंतर एकदिवसीय सामन्यात सर्वात संथ अर्धशतक करण्याचा हा विक्रम आता धोनीच्या नावावर झाला आहे.

काल भारताच्या या दिग्गज खेळाडूने विंडीज विरुद्ध खेळताना एक बाजूने किल्ला लढवत भारतीय संघाला विजय मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. परंतु त्याच्या या प्रयत्नांना यश आले नाही.
सर्वाधिक संथ फलंदाजी भारताकडून करण्याचा विक्रम सदगोपान रमेश यांच्या नावावर आहे. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध खेळताना ११० चेंडूत अर्धशतक केले होते तर २०० चेंडूत ८२ धावा केल्या होत्या.

धोनी आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून भारताचा आणखी एक माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने २००५ साली श्रीलंकेविरुद्ध १०५ चेंडूत तर २००७ साली बांगलादेश विरुद्ध १०४ चेंडूत अर्धशतक केले होते.

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ २००३ साली न्युझीलँड विरुद्ध ९८ चेंडूत तर २००५ साली झिम्बाब्वे विरुद्ध ९७ चेंडूत अर्धशतक केले होते.

भारताचा मालिकेतील विंडीज विरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना ६ जुलै रोजी आहे.

PC: http://www.espncricinfo.com