विंडीज वन-डे मालिकेतील वन-डे सामन्यांत धोनीला मिळू शकतो डच्चू

मुंबई | सध्या कारकिर्दीच्या अतिशय खराब फाॅर्ममधून जात असलेल्या एमएस धोनीसाठी पहिली धोक्याची घंटा वाजली आहे. विंडीजविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेत धोनीबरोबरच यष्टीरक्षक रिषभ पंतलाही संधी मिळू शकते.

या मालिकेसाठी संघ निवड कधी होणार याबद्दल काहीही माहिती समोर आली नाही तसेच किती सामन्यांसाठी हा संघ घोषीत होणार आहे याबद्दलही कोणती स्पष्टता नाही.

ही मालिका २१ आॅक्टोबरपासून सुरु होणार आहे. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वन-डेत पुनरागमन करेल की त्याला या मालिकेसाठीही विश्रांती देण्यात येईल याबद्दल अजून काहीही समोर आले नाही. तो एशिया कपवेळी संघात नव्हता.

या मालिकेसाठी पंतला संधी देण्याचा विचार निवड समिती करत आहे. त्याचा बॅकअप विकेटकीपर म्हणुन या मालिकेसाठी विचार होऊ शकतो.

धोनी सध्या जरी चांगले यष्टीरक्षण करत असला तरी त्याला फलंदाजीत मोठे अपयश आले आहे.

“आपणा सर्वांना माहित आहे की धोनी २०१९चा विश्वचषक खेळणार आहे. त्याचप्रमाणे पंतला संधी देऊन वन-डेसाठी एक चांगला खेळाडू घडविण्यात काही नुसकान नाही. तो ६व्या किंवा ७व्या नंबरसाठी चांगला फलंदाज तयार होऊ शकतो. त्याच्याकडे सामना संपविण्याची चांगली क्षमता आहे.” असे एक बीसीसीआयचा अधिकारी नावं न सांगण्याच्या अटीवर म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-