विंडीज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी

भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला टी-20 सामना बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या ईडन गार्डन या कोलकत्यातील मैदानावर होणार आहे.
या सामन्याबाबत कोणत्याही प्रकारची अनिश्चितता नसल्याचा निर्वाळा बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला आहे.
भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला टी-20 सामना 4 नोव्हेंबरला होणार असल्याने  सामन्याचे तिकीट छापण्यासाठी पाठवले आहेत. त्यामुळे या बाबत कोणत्याही प्रकारची अनिश्चितता असणार नाही.
बीसीसीआयच्या नवीन घटनेनुसार एकूण तिकिटांपैकी 90 टक्के तिकिट विक्रीसाठी ठेवले जााणार आहेत. तर दहा टक्के तिकीट हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून ठेवण्यात आले आहेत.
”ईडन गार्डन या मैदानाची क्षमता 67 हजार एवढी आहे. त्यापैकी 30,000 तिकीट हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून शासकीय संस्थांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोलकत्ता पोलीस, महानगरपालिका आणि अग्निशामन दल यांची समावेश आहे”. अशी माहिती गांगुली यांनी दिली.
भारत आणि विंडीज यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममधून हलवण्यात आला असून तो विशाखापट्टनम येथील डाॅ. वाय एस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए या मैदानावर होणार आहे.

वन-डे मालिकेला 21 आॅक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ विडींज बरोबर 3 टी-20 सामने खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-