राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, पृथ्वी शाॅ करणार पदार्पण

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज दोन कसोटी सामन्यांतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी १२ खेळाडूंचा संघ आज घोषीत करण्यात आला. या सामन्यात १८ वर्ष ३२८ दिवस वय असलेला पृथ्वी शाॅ पदार्पण करणार आहे.

त्याला सलामीवीर म्हणुन संघात स्थान देण्यात आले असुन मयांक अग्रवालला पदार्पणासाठी वाट पहावी लागणार आहे.

१२ खेळाडूंच्या या संघात विराट कोहली, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.

यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला १२वा खेळाडू म्हणुन स्थान देण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या ५ कसोटी सामन्यांपैकी शेवटच्या २ सामन्यांसाठी पृथ्वी शाॅ संघात स्थान देण्यात आले होते परंतू अंतिम ११ खेळाडूंमध्ये मात्र त्याचा सामावेश करण्यात आला नव्हता.

कसोटी पदार्पणासाठी मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवाल यांना वाट पहाणी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय