तिसऱ्या वन-डेत दोन मुंबईकर येणार टीम इंडियाकडून सलामीला!

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध विंजिड संघातील कसोटी मालिकेत 18 वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉने शानदार कामगिरी करताना अनेकांची वाहवा मिळवली आहे. त्याची ही कामगिरी पाहता त्याला विंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेतही भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

याविषयी भारतीय संघ व्यवस्थापन शॉकडे कसोटी सलामीवीर बरोबरच पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी सलामीचा पर्याय म्हणूनही पाहत आहे.

असे असले तरी रोहित शर्मा आणि शिखर धवन हेच सलामीसाठी भारतीय संघाचे मुख्य पर्याय असणार आहेत. संघव्यवस्थापन आणि निवड समीतीचा पर्यायी सलामीवीर म्हणून शॉकडे आणि वरिष्ठ खेळाडूंना ताजेतवाणे ठेवण्याकडे कल आहे.

याबद्दलची चर्चा मागच्या आठवड्यात आढाव्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. या बैठकीसाठी निवड समीती सदस्य, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे देखील उपस्थित होते.

शॉने विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या मालिकेत त्याने एक शतक आणि एक अर्धशतकासह 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला आहे.

तसेच शॉ सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असून त्याने आज (17 ऑक्टोबर) मुंबईकडून खेळताना उपांत्य सामन्यात हैद्राबादविरुद्ध 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली आहे.

त्याने ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 23 सामन्यात 43.43 च्या सरासरीने 999 धावा केल्या आहेत. यात त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीचा या विक्रमाला आहे हिटमॅन रोहित शर्माकडून धोका

वाढदिवसाच्याच दिवशी कुंबळेने केले विराटला टॅग