आज ९२ धावा करणाऱ्या पंतच्या वाढदिवसाचे काल असे सेलिब्रेशन

काल (4 आॅक्टोबर ) भारतीय संघाचा अाक्रमक फलंदाज आणि विकेट किपर रिषभ पंतचा 21 वा वाढदिवस भारतीय संघाने साजरा केला. कालच भारत आणि विडींज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली.

भारतीय संघाने रिषभचा वाढदिवस खास आपल्या शैलीत साजरा केला. त्याच्या संपुर्ण  चेहऱ्यावर केक लावून फोटो काढले आहेत. अशा प्रकारची परंपरा सध्या भारतीय संघात आहे. त्यानंतर त्याच्या वाढदिवसाचे फोटो काढले आहेत.

एशिया कप स्पर्धेदरम्यान अंबाती रायडूचा वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा केला होता. त्याच्या देखील संपुर्ण चेहऱ्यावर केक लावून आनंद साजरा केला होता.

बीसीसीआयच्या अधिकृत हॅन्डलवर रिषभचे केक कापताना फोटो टाकले आहेत. त्याचबरोबर त्याला शुभेच्छा देणारा संदेश देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारतीय संघाने विंडीजविरूद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशी दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले आहे. पदार्पणातच पृथ्वी शाॅने शतक ठोकत 134 धावांची खेळी केली आहे. तर पंतने आज स्फोटक ९२ धावांची खेळी केली.

महत्वाच्या बातम्या-