वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट

भारत विरुद्ध विंडीज मधील 29 ऑक्टोबरला होणारा चौथा वनडे सामना ब्रेबॉर्न की वानखेडे स्टेडीयमवर खेळवला जाणार याबाबतचे वाद-विवाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. पण आता हा सामना क्रिकेट क्लब ऑफ इंडीया (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडीयमवर घेणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

यावेळी सीसीआय कोलकातामधील इडन गार्डन आणि लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट स्टेडीयमप्रमाणे सामना सुरू होण्यापूर्वी फाइव्ह मिनिट बेल वाजवण्याच्या प्रथेला सुरूवात करणार आहे. या प्रथेची सुरूवात ते दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या हस्ते करणार आहेत.

“सचिन बेल वाजवणार याबद्दलची सगळी तयारी झाली आहे. आमचे त्याच्यासोबत एक विशेष नाते आहे. आम्ही त्याला वयाच्या 18व्या नाहीतर 15व्या वर्षी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश देऊन आमचा एक महत्त्वाचा नियम तोडला होता. आता त्याचा मुलगा अर्जुन आमच्या क्लबसाठी खेळत आहे”, असे सीसीआयने म्हटले आहे.

“याआधी आम्ही सराव सामन्याच्या वेळी माजी क्रिकेटर्सना बेल वाजवण्याच्या प्रथेला आमंत्रण देत होतो. पण पहिल्यांदाच आम्ही मुख्य सामन्यास याची सुरूवात करत आहे”, असेही सीसीआयने म्हटले आहे.

याआधी सचिनची लॉर्ड्सवरील ऑगस्टमध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी फाइव्ह मिनिट बेल वाचवण्याची संधी हुकली होती.

“आम्ही बेल वाजवण्याच्या प्रथेला तयार होतो. पण वातावरण बदलामुळे ते शक्य होऊ शकले नाही”, असे ट्विट सचिनने केले होते.

तसेच सीसीआय बाकीच्या माजी क्रिकेटर्सना मुंबईतील सामना बघण्यास आमंत्रित करणार आहे.

या सामन्याच्या ऑनलाईन तिकीटांचे बुकींग आजपासून सुरू झाले आहे. यावेळी स्टेडियममधील 22,557 पैकी 600 तिकीटे सीसीआयच्या सभासदांसाठी बुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?

८० वर्षांचा धोनी व्हिलचेअर असेल तरी त्याला माझ्या संघात खेळव

गांगुली फॅन्सचे टेन्शन वाढले, विराटकडून हा विक्रम किरकोळीत मोडला जाणार