हैद्राबादमध्ये कोहली मोडणार पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकचा विक्रम

हैद्राबाद | भारत विरुद्ध विंडीज कसोटी मालिकेतील दुसरा कसोटा सामना १२ आॅक्टोबरपासून सुरु होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पाकिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार इंझमाम उल हकचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ७२ कसोटी सामन्यांत ५४.६६च्या सरासरीने ६२८६ धावा केल्या आहेत. यात त्याने २४ कसोटी शतके केली आहेत. त्याचप्रमाणे इंझमाम उल हकने १२० सामन्यात ४९.६०च्या सरासरीने ८८३० धावा केल्या आहेत. इंझमामनेही कसोटीत २५ शतके केली आहेत.

हाच शतकांचा विक्रम मोडण्याची संधी विराटला आहे. जर विराटने हैद्राबाद कसोटीत शतक केले तर तो कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो २०व्या स्थानावर येईल.

या यादीत ५१ शतकांसह सचिन अव्वल स्थानी आहे.

भारतीय संघाने विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत राजकोटला १-० अशी आघाडी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-