आसीसीच्या त्या नियमाने कर्णधार विराट कोहली वैतागला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आसीसीच्या कसोटी सामन्यातील पाणी पिण्याच्या वेळच्या नियमासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आसीसीने 30 सप्टेंबरपासून लागू केलेल्या नविन नियमानुसार सामन्यांदम्यान फक्त विकेट पडल्यावर आणि  दोन  षटकांच्या दरम्यान तसेच पंचाच्या परवानगीने मधल्या वेळेत पाणी पिण्यासाठी परवानगी दिली आहे.

भारत आणि विंडिज यांच्यातील राजकोट येथील पहिल्या कसोटी सामन्यात तापमान तीनही दिवस 40 डिग्री सेल्सियसच्यावर पोहचले होते. सामना चालू असताना नविन नियमानुसार दोन्ही संघाच्या खेळाडूंना पाणी पंचाच्या परिवेक्षणात दिले जात होते.

”पंचही आम्हाला या सामन्यात नविन नियमांची सतत आठवण करून देत होते.” सामन्यातील परिस्थीतीनुसार यासंबंधी निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा कोहलीने सामना संपल्यानतर पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

आसीसीच्या या बदलाने 40 ते 45 मिनीटे पाणी न मिळाल्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना त्रास होत होता.

भारताच्या चेतेश्वर पुजाराने आयसीसीच्या या नियमाला पर्याय शोधला आहे. पुजाराने या सामन्यात फलंदाजी करताना चक्क त्याच्या खिशात एक छोटीशी पाण्याची बाटली आणली होती. गरमीच्या तडाख्यातून वाचण्यासाठी त्याने हा पर्याय अवलंबला होता.

महत्वाच्या बातम्या-