अबब! विंडीजचे ४ फलंदाज ६ तासांत दोनदा बाद

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारताने विंडिजचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आणला होता. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 468 धावांची भक्कम आघाडी घेतल्याने विंडिजला फॉलोआॅन दिला.

परंतू पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही विंडिजची फलंदाजी 196 धावात कोलमडली.

एकाच दिवसांत चार फलंदाज दोनवेळा बाद-

कालच्या ६ बाद ९४ धावसंख्येवरुन विंडीजने पुढे खेळायला सुरुवात केली. आज विंडीजचे किमो पाॅल, रोस्टन चेस, शेर्मन लेविस आणि शॅनन ग्रबील हे फलंदाज विशेष कामगिरी न करता पहिल्या डावात सकाळी बाद झाले. हे सर्व फलंदाज आजच पुन्हा दुसऱ्या डावातही बाद झाले.

यातील रोस्टन चेस सकाळी ८व्या तर दुपारी ५व्या विकेटच्या स्थानावर बाद झाला. तसेच किमो पाॅल (पहिला डाव- ७वी विकेट आणि दुसरा डाव ७वी विकेट), शेर्मन लेविस (पहिला डाव- ९वी विकेट आणि दुसरा डाव ९वी विकेट) आणि शॅनन ग्रबील (पहिला डाव- १०वी विकेट आणि दुसरा डाव १०वी विकेट) हे फलंदाज दोनदा बाद झाले.

विशेष म्हणजे या चारही फलंदाजांनी कोणत्याही गोलंदाजाला आपल्याला परत बाद करु दिले नाही. हीच त्यांच्यासाठी काही ती जमेची बाब राहिली.

महत्वाच्या बातम्या-