लाॅर्ड्सवरच ९६ धावांत आॅल आऊट होऊनही भारताने केला होता मोठा पराक्रम

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.

भारताची या मैदानावरील ही नक्कीच निचांक्की धावसंख्या नाही. २ आॅगस्ट १९७९ रोजी सुरु झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव चक्क ९६ धावांतच संपुष्टात आला होता.

इयान बोथमच्या भेदक माऱ्यासमोर सुनिल गावसकर सोडून कोणताही फलंदाज तग धरु शकला नव्हता. बोथमने त्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या तर गावसकरांनी सर्वोच्च ४२ धावा केल्या होत्या.

त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ९ बाद ४१९वर डाव घोषीत केला. त्यांच्याकडे ३००हुन अधिक धावांची आघाडी होती. त्यामुळे भारताचा पराभव जवळपास अटळ होता.

परंतु भारताच्या दुसऱ्या डावात सर्वच फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात हातभार लावला.

सलामीविर सुनिल गावसकर ५९वर बाद झाल्यावर दिलीप वेंगसकर (१०३) आणि गुंडप्पा विश्वनाथ (११३) यांनी शतकी खेळी केल्या. त्यामुळे भारताने ४ बाद ३१८ धावा करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

यष्टीरक्षकाने झेल सोडला असतानाही गोलंदाजाने केले सेलिब्रेशन

अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक

जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी