भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली

पल्लेकेल: येथे सुरु असलेली तिसरी आणि शेवटची कसोटी भारताने १ डाव आणि  १७१ धावांनी जिंकून श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका ३-०ने जिंकली. याबरोबर तीन किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने प्रथमच परदेशात एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे.

श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात निरोशन डिकवेल्ला ४१, चंडिमल ३६ आणि अँजेलो मॅथेव ३५ यांनी थोडाफार प्रतिकार केला, भारताकडून मोहम्मद शमी ३, आर अश्विन ३, उमेश यादव २ तर कुलदीप यादव १ यांनी विकेट्स घेतल्या .

काल श्रीलंकेने १ बाद १९ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. परंतु ठराविक अंतराने त्यांच्या विकेट्स पडत गेल्या.

परदेशातील डावाच्या फरकाने भारताचा हा दुसरा मोठा विजय ठरला आहे तर श्रीलंकेविरुद्ध सलग ५ सामन्यात भारतने ५ विजय मिळविले आहेत. ३ किंवा त्यापेक्षा जास्त सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताने ५व्यांदा एखाद्या संघाला व्हाइट वॉश दिला आहे.

संक्षिप्त धावफलक:

भारत पहिला डाव: ४८७/१०
शिखर धवन ११९
हार्दिक पंड्या १०८
लोकेश राहुल ८५
लक्षण संदकन ५/ १३२, मलिंदा पुष्पाकुमारा ३/२३

श्रीलंका पहिला डाव: १३५/१०
दिनेश चंडिमल ४८
निरोशन डिकवेळला २९
मलिंदा पुष्पाकुमारा १०
कुलदीप यादव ४/४०, मोहम्मद शमी २/१७

श्रीलंका दुसरा डाव
निरोशन डिकवेल्ला ४१
दिनेश चंडिमल ३६
अँजेलो मॅथेव ३५
आर अश्विन ४/६८, मोहम्मद शमी ३/३२

भारतने १ डाव आणि १७१ धावांनी विजय मिळविला.