पावसाच्या व्यत्ययानंतर टीम इंडियासमोर १७४ धावांचे आव्हान

ब्रिस्बेन। आज (21 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 17 षटकात 4 बाद 158 धावा केल्या आहेत.

पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 17-17  षटकांचा करण्यात आला असून भारतासमोर डकवर्थ लूईस नियमानुसार 174 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. आॅस्ट्रेलियाकडून डॉर्सी शॉर्ट(7) आणि एॅरॉन फिंच यांनी चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतरही शॉर्टने लवकर विकेट गमावली. शॉर्टला भारताच्या खलील अहमदने त्याच्या पहिलाच चेंडूवर बाद केले.

त्यानंतर फिंच आणि ख्रिस लिनने डाव सावरला होता. पण त्यांची भागीदारी रंगत असतानाच कुलदीप यादवने 27 धावांवर खेळणाऱ्या फिंचला बाद करत आॅस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला.

त्याच्यापाठोपाठ कुलदीपने आक्रमक खेळणाऱ्या ख्रिस लिनलाही स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. लिनने 37 धावांची खेळी केली. या तीन विकेटनंतर मात्र आॅस्ट्रेलियाचा डाव अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांनी सांभाळला.

त्यांनी अर्धशतकी भागीदारीही रचली असताना 17 व्या षटकादरम्यान पावसाचा व्यत्यय आल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा मॅक्सवेल आणि स्टॉयनिस फलंदाजीसाठी आले. पण मॅक्सवेल लगेचच बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले.

मॅक्सवेल आणि स्टॉइनिस (33*) या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली

पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ

१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी

आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी