- Advertisement -

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देईल: हरभजन सिंग

0 69

भारतीय गोलंदाज हरभजन सिंग याने ऑस्ट्रेलिया संघाला विराट आणि सहकारी व्हाईटवॉश देतील, असे विधान केले आहे .यावेळी हरभजन सिंगने कठोर शब्दात ऑस्ट्रलियन संघावर टीका केली आहे.

त्याच बरोबर हरभजन म्हणाला, “ऑस्ट्रलियन संघाचा खेळ पाहून असं वाटतंय की श्रीलंकन संघ पिवळी जर्सी घालून खेळतोय. याआधी मी कधीच ऑस्ट्रेलियन संघाला असा खेळ करताना पाहिलं नाही. मला जेवढा विराट आणि त्याच्या संघाला ओळखतो त्यावरून ते नक्कीच व्हाईटवॉश देण्याचा विचार करत असतील.”

भारतीय संघ चालू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा आघाडीवर आहे. २८ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला उर्वरित २ सामने होणार आहेत. हे सामने जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला व्हाईटवॉश देण्याची संधी विराटच्या संघाला असणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: