आता टीम इंडिया खेळू शकते अमेरिकेबरोबर अमेरिकेत क्रिकेट, जाणून घ्या कारण

आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) अमेरिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सदस्यत्व बहाल केले आहे. यामुळे अमेरिका (युएसए क्रिकेट) आयसीसीचा 105वा सदस्य बनला आहे.

युएसए क्रिकेटने 2017मध्ये त्यांचा अर्ज आयसीसीकडे पाठवला होता. आयसीसीकडून अधिकृत संमती मिळवणारे ते 93वे सदस्य बनले आहेत. आंतरराष्ट्रीय सभासद बनल्याने त्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीकडून वार्षिक निधीही मिळणार आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी यावेळी युएसए क्रिकेटचे अध्यक्ष पराग मराठे यांचे अभिनंदन केले आहे. युएसए क्रिकेट बोर्ड हे सगळे अमेरिका क्रिकेटचे कामकाज बघणार आहे.

“अमेरिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा मिळाल्याने खूप आनंद आला. आम्हाला अमेरिकेत क्रिकेट प्रसिद्ध करायचे आहे. मागील 18 महिन्यांपासून हजार लोकांनी केलेल्या कष्टाचे हे चीज आहे”, असे पराग मराठे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडिया विरुद्धच्या वन-डे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!

‘कॉफी विथ करन’ शो हार्दिक पंड्या, केएल राहुलला भोवला, बीसीसीआय देणार ही मोठी शिक्षा!

संपुर्ण वेळापत्रक: असा असेल फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारा ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा