कधी खेळणार टीम इंडिया डे नाईट टेस्ट मॅच

क्रिकेट आॅस्ट्रेलियाचा दिवस-रात्र कसोटी सामन्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपुर्वीच फेटाळला होता. भारताच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड येथे होणारी कसोटी दिवस- रात्र खेळवण्याचा प्रस्ताव होता.

”बीसीसीआय दिवस-रात्र कसोटी सामन्यांवर काम करत अाहे. जेव्हा ते पुर्ण होईल तेव्हा जाहीर केले जाईल,” असे प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडूलजी यांनी सांगितले.

त्या नवव्या दिलीप सरदेसाई मेमोरिअल व्याख्यानमालेत बोलत होत्या. त्यांना हा सामना भारतात होईल की दुसरीकडे याच्या संर्दभात विचारले असता त्यांनी कुठेही होऊ शकतो असे उतर दिले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भलेही याचा विचार करत असेल पण आता आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचा दिवस रात्र कसोटी सामना चाहत्यांना पाहता येणार नाही हे मात्र खरे आहे. कसोटी क्रिकेटची लोप पावत चाललेली प्रसिद्धी परत मिळवण्यासाठी कसोटी क्रिकेटचे दिवस-रात्र सामने आयोजित करण्याची संकल्पना मांडली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-