टीम इंडिया आता खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना

भारतीय संघाने भविष्यात दिवस-रात्र कसोटी खेळावी यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासक समीतीच्या सदस्या डायना एडुलजी यांनी सांगितले आहे.

भारताने डिसेंबरमध्ये होणाऱ्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड येथे होणारा कसोटी सामना  दिवस-रात्र खेळण्यास नकार दिला होता.

दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ आयोजीत केलेल्या नवव्या व्याख्यानात एडुलजी बोलत होत्या. यावेळी त्या गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र कसोटीविषयी म्हणाल्या, ‘आम्ही त्यावर (दिवस-रात्र कसोटी) काम करत आहोत. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा हा कसोटी सामना होईल.’

तसेच भारत दिवस रात्र कसोटी सामना भारतात की परदेशात खेळणार, याविषयी एडुलजी म्हणाल्या, भारत कुठेही हा सामना खेळेल.

भारताने भारतात तसेच आॅस्ट्रेलियातही दिवस रात्र कसोटी सामना खेळण्याची संधी गमवली असल्याने त्याबद्दल एडुलजींनी सांगितले की, ‘असे होते पण ही गोष्ट बदलेल.’

महत्त्वाच्या बातम्या-

शाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना

एशिया कप गाजवणारा राशिद खान म्हणतो, केवळ या गोष्टीमुळे मिळाले यश

विराटला बाद करण्याचा मंत्र सापडला- वकार युनुस