२०१९ विश्वचषकात भारताचा पहिला सामना होणार या संघासोबत

मुंबई । २०१९च्या विश्वचषकात भारतीय संघ पहिला सामना ४ जून रोजी खेळणार आहे. हा सामना संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. 

२०१९ चा विश्वचषक इंग्लंड देशात होत असून ३० मे ते १४ जूलै २०१९ या काळात होणार आहे. त्यापुर्वी भारतीय खेळाडू तसेच जगातील बरेच खेळाडू २९ मार्च ते १९ मे दरम्यान आयपीएलमध्ये सहभागी होतील. 

त्यामुळे भारतीय संघाला विश्वचषकाच्या तयारीला केवळ २ आठवडे मिळणार आहेत. 

२०१५मध्ये क्रिकेट विश्वचषक आॅस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड देशात झाला होता. तसेच हे दोन देश या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळले होते. त्यात आॅस्ट्रेलियाला विजेतेपद मिळाले होते. 

भारतीय संघ २०११ साली माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली हा विश्वचषक जिंकला होता.