पहा भारताने दुसरी कसोटी जिंकून केले कोण कोणते विक्रम !

गॉलच्या कसोटी नंतर भारताने पुन्हा श्रीलंकेला कोलंबोमधे मत देऊन मालिका आपल्या नावावर करून घेतली आहे. या कसोटी विजयाचा शिल्पकार ठरला रवींद्र जडेजा, ज्याने अष्टपैलू कामगिरी करून भारताला जिंकून दिले. या कसोटी सामन्यात वैयक्तिक आणि सांघिक असे अनेक विक्रम झाले. पाहुयात कोणते आहेत हे विक्रम.

१. मागील एका वर्षात जडेजा चौथ्यांदा सामनावीर ठरला आहे. त्याच्यानंतर विराट कोहलीला ३ वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

२. भारताकडून जिंकलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक म्हणजेच २०५ विकेट्स घेणारा अश्विन तिसरा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळे २८८ आणि हरभजनने २२१ विकेट्स घेतल्या आहेत.

३.भारताचा सलग आठवा मालिका विजय. सर्व मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीच होता, सलग ८ मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार. आता फक्त ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग ९ विजयांसह आघाडीवर विराटच्या पुढे.

४. राहणेने ३९ सामन्यात ५० झेल पूर्ण केले.

५. भारताने आतापर्यंत ७ विदेशी मैदानांवर कसोटीत डावाने विजय मिळवला आहे.

६. भारताचा हा श्रीलंकेतील सलग चौथा कसोटी विजय होता. ऑस्ट्रेलियानंतर भारत असा विक्रम करणारा पहिला देश आहे.

७. हा भारताचा श्रीलंकेवर पहिला डावाने विजय आहे.

८. श्रीलंकेत जाऊन ३ पेक्षा जास्त सामने जिंकणारा विराट पहिला कर्णधार बनला आहे. या आधी हा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता.

९. फॉलो ऑन दिल्यानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेच्या दोन फलंदाजांनी शतक लगावले.

१०. या सामन्यात १६ षटकार लगावण्यात आले, हे आता पर्यंतच्या श्रीलंकेतल्या कसोटी सामन्यातील सर्वाधिक आहेत.

११. करुणारत्ने चे हे फॉलो ऑन करतानाचे दुसरे शतक आहे, असे करणारा तो श्रीलंकेचा पहिला खेळाडू आहे.