भारताने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय, हे आहेत ११ खेळाडू

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात काल जाहीर झालेल्या संघातील शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागणार आहे.

भारताने या सामन्यात पृथ्वी शाॅला पदार्पणाची संधी दिली आहे तर गोलंदाजीत अश्विन, जडेजा आणि कुलदीप यादव या तीन फिरकी  तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी या वेगावान गोलंदाजांवर संघाची धुरा असणार आहे.

अशी आहे टीम इंडिया- विराट कोहली, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि उमेश यादव

शाॅचे पदार्पण- 

भारताकडून आजपर्यंत शाॅ सोडून एकूण २९२ खेळाडूंना कसोटीत संधी मिळाली आहे. त्यात यावर्षी जानेवारी महिन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले होते.

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंतने तर पाचव्या कसोटीत हनुमा विहारीने कसोटी पदार्पण केले होते. यातील केवळ रिषभ पंतच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता तर बुमराह आणि विहारीच्या पदार्पणाच्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पहावा लागला होता.

भारताकडून कसोटी पदार्पण करणारा शाॅ हा एकूण २९३वा खेळाडू ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

एशिया कपमध्ये खेळलेल्या २१ वर्षीय खेळाडूने पायलट बनण्यासाठी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

विराट कोहलीला अझरुद्दीनचा हा विक्रम मोडण्याची संधी

विजय हजारे ट्राॅफी: विदर्भाचा महाराष्ट्रावर 3 विकेट्सने विजय