निदाहास ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी असा आहे ११ जणांचा भारतीय संघ

कोलंबो। आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नेणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडिअमवर होणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश संघांमध्ये याआधी साखळी फेरीत दोन सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

भारताने साखळी फेरीतील ४ पैकी ३ सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर बांग्लादेशने श्रीलंकेला दोन्ही साखळी सामन्यात पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले.

या मालिकेत भारतीय संघ नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

आज भारतीय ११ जणांच्या भारतीय संघात जयदेव उनाडकटला मोहम्मद सिराजच्या ऐवजी संधी मिळाली आहे. हा एकमेव बदल भारतीय संघात करण्यात आला आहे.

असा आहे ११ जणांचा भारतीय संघ:
भारत: रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, जयदेव उनाडकत.