भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आज चौथा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना गुलाबी सामना म्हणून खेळवण्यात येणार आहे.

स्तनाच्या कर्करोगाची जागरूकता म्हणून हा गुलाबी सामना ओळखला जातो. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करून मैदानात उतरेल.

दक्षिण आफ्रिका आजपर्यंत गुलाबी सामन्यात पराभूत झालेली नाही त्यामुळे ते आजही हा इतिहास न बदलण्याच्या इराद्याने मैदानांत उतरतील. त्याचबरोबर भारतीय संघही हा सामना जिंकून ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

तसेच हा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर त्यांना भारत प्रथमच दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिका जिंकण्याचा इतिहास रचेल.

आजच्या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुनरागमन करत आहे. त्यामुळे खाया झोन्डो संघाबाहेर गेला आहे आणि इम्रान ताहीर ऐवजी मोर्ने मॉर्केलला ११ जणांच्या संघात स्थान मिळाले आहे.

तसेच आज ११ जणांच्या भारतीय संघात श्रेयश अय्यरला संधी मिळाली आहे. त्याला केदार जाधव ऐवजी ११ जणांच्या संघात घेण्यात आलेले आहे.

असा आहे ११ जणांचा भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल, श्रेयश अय्यर.

दक्षिण आफ्रिका संघ:एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगीसानी एन्गिडी,अँडिल फेहलूकवयो, कागिसो रबाडा