दुसऱ्या टी २० सामन्यासाठी असा आहे भारतीय महिला संघ

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला संघात आज दुसऱ्या टी २० सामना होणार असून या सामन्यात भारतीय महिला संघाने नेणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

५ सामन्यांच्या या टी २० मालिकेत भारतीय संघाने पहिला टी २० सामना जिंकून आघाडी १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा हा सामना जिंकून आघाडी वाढवण्याचा प्रयत्न असेल. तर दक्षिण आफ्रिकेचा पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल.

पहिल्या सामन्यात मिताली राजने अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती. तिला स्म्रिती मानधना, वेदा कृष्णमूर्थी, आणि जेमिमा रोड्रिगेजने चांगली साथ दिली होती.

आजच्या ११ जणांचा संघात काहीही बदल झाला नाही. पहिल्या सामन्यात खेळलेला संघच या सामन्यासाठीही कायम ठेवण्यात आला आहे.

असा आहे ११ जणींचा भारतीय संघ: हरमनप्रीत कौर(कर्णधार), स्म्रिती मानधना(उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णामूर्थी, जेमिमा रोड्रिगेज, अनुजा पाटील, तानिया भाटिया(यष्टीरक्षक), पूनम यादव, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.