भारतीय महिला संघाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने काल भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात पुढील वर्षी होणाऱ्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही वनडे मालिका ३ सामन्यांची होणार असून ८ एप्रिल २०१८ पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे तीनही सामने कोणत्या मैदानावर खेळवणार आहेत हे मात्र अजून घोषित झालेले नाही.

ही ३ सामन्यांची द्विपक्षीय वनडे मालिका २०१७ ते २०२० मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला चॅम्पिअनशिपचा भाग असेल. इंग्लंडचा महिला संघाचा भारत दौरा मार्च महिन्यात सुरु होणार आहे.

भारत आणि इंग्लंड (महिला) संघात होणाऱ्या या वनडे मालिकेआधी भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघात तिरंगी टी २० मालिका रंगणार आहे. या तिरंगी मालिकेला २२ मार्च पासून सुरुवात होणार असून हे सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर होणार आहेत.

भारतीय महिला संघ यावर्षी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्धच पराभूत झाला होता.

अशी होईल भारत महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ वनडे मालिका:

८ एप्रिल २०१८ – पहिला सामना
११ एप्रिल २०१८ – दुसरा सामना
१४ एप्रिल २०१८ – तिसरा सामना