दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या महिला संघांची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा झाली असून कर्णधारपदी मिताली राजला कायम ठेवण्यात आले आहे. या दौऱ्यात उपकर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आली आहे.

भारत या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. यातील वनडे सामने हे आयसीसी वूमन चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.

या संघ वनडे सामने खेळणार असून टी२० साठी संघांची लवकरच घोषणा होणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिलांचा संघ (वनडे)
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिस्त, स्म्रिती मानधना, पूनम राऊत, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, जेमिमाह रॉड्रीगुएस, झुलन गोस्वामी, दीप्ती गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, मोना मेश्राम, पूजा वस्त्रकार, वेदा कृष्णामूर्थी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक)