दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी २० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

भारतीय महिला संघही दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी काल बीसीसीआयने टी २० संघाची घोषणा केली. भारतीय महिला संघाचा दौरा पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे.

या टी २० संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असेल, तर उपकर्णधारपद स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या संघात राधा यादव आणि नुजत परवीन आणि मुंबईची १७ वर्षीय खेळाडू जेमिमा रोड्रिगेज यांची प्रथमच निवड झाली आहे.

मात्र या संघात नियमित खेळाडू मोना मेश्राम, सुषमा वर्मा, एकता बिश्त आणि पूनम राऊत यांना स्थान देण्यात आलेले नाही.

भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी २० सामने खेळणार आहे. ५ फेब्रुवारीपासून वनडे मालिका आणि १३ फेब्रुवारीपासून टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे.

वनडे संघाची घोषणा आधीच झाली आहे. या संघाचे नेतृत्व मिताली राज करणार आहे.

असा आहे टी २० मालिकेसाठी भारतीय महिला संघ:

हरमनप्रीत कौर(कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार),मिताली राज, वेदा कृष्णामूर्थी,जेमिमा रोड्रिगेज,दिप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया(यष्टीरक्षक), नुजत परवीन(यष्टीरक्षक), पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.

अशी असेल टी २० मालिका (दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत ):

१३ फेब्रुवारी – पहिला टी-२० सामना, पॉटचेस्टरूम
१६ फेब्रुवारी – दुसरा टी-२० सामना, ईस्ट लंडन
१८ फेब्रुवारी – तिसरा टी-२० सामना, जोहान्सबर्ग
२१ फेब्रुवारी – चौथा टी-२० सामना, सेंच्युरियन
२४ फेब्रुवारी – पाचवा टी-२० सामना, केप टाऊन