भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात आज पहिला टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या मालिकेआधी पार पडलेली ३ सामन्यांची वनडे मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली होती. त्यामुळे त्यांचा या मालिकेतही हाच चांगला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकाही या टी २० मालिकेसाठी तिसरा वनडे सामना जिंकल्यामुळे आत्मविश्वास मिळाला असेल.

त्याचबरोबर या मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारताला झुलन गोस्वामी दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने धक्का बसला आहे. त्यामुळे आता तिच्या गैरहजेरीत भारतीय संघाला ही मालिका खेळावी लागणार आहे. तसेच भारतीय संघाच्या टी २० संघाचे कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे आहे.

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर(कर्णधार), स्म्रिती मानधना(उपकर्णधार),मिताली राज, वेदा कृष्णामूर्थी,जेमिमा रोड्रिगेज,अनुजा पाटील,तानिया भाटिया(यष्टीरक्षक),पूनम यादव, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.