भारताने नाणेफेक जिंकली, जाणून घ्या भारताचे ११ खेळाडू

चेन्नई । भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यातील नाणेफेक विराट कोहलीने जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाकडून हिल्टन कार्टराइट हा आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण करणार आहे.

भारतीय संघात शिखर धवनच्या जागी मुंबईकर अजिंक्य रहाणे खेळणार आहे तर चौथ्या क्रमांकावर मनीष पांडे खेळणार आहे. जडेजाला या सामन्यात संधी देण्यात आली नाही.

भारतीय संघ: रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, हादिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, हिल्टन कार्टराइट, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), हेड, ग्लेन मॅक्सवेल, स्टोनीस, मॅथ्यू वेड, जेम्स फॉल्कनर,पॅट कमिन्स,अॅडम झाम्पा, नॅथन कॉल्टर-नाइल