जागतीक बॅडमिंटन स्पर्धेला भारतीय खेळाडूंच्या संख्येचा चढता आलेख

बॅडमिंटन या खेळाची भारतातील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या खेळातील खेळाडू अंतरराष्ट्रीय पातळीवर विजेतेपद मिळवत आहेत. त्यामुळे या खेळाडूंची लोकप्रियता वाढते आहे. भारतीय खेळाडूंची मागील काही वर्षातील कामगिरी पाहता या खेळातील खेळाडूंना ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडीया’ पूर्ण पाठिंबा देते आहे. ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडीया’ या खेळातील सर्व सोयी-सुविधा, नवीन तंत्रज्ञान खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात कोणतीही कसर ठेवत नाहीय.

जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत याचे एक मुख्य कारण म्हणजे या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणाऱ्या खेळाडूंची संख्या. मागील काही वर्षांपासून स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या खेळाडूंच्या संख्येत सतत वाढ होत आहे. ही भारतासाठी एक जमेची बाजू ठरत आहे.

२०११ पासून जागतीक बॅडमिंटन स्पर्धेला पाठवण्यात आलेल्या खेळाडूंच्या संख्येचा चढता आलेख आपल्याला पाहायला मिळतो. २०११ साली जागतीक बॅडमिंटन स्पर्धेला १२ खेळाडू पाठवण्यात आले होते. २०१३ साली १४ खेळाडू या स्पर्धेला पाठवण्यात आले. २०१५ साली या स्पर्धेला १८ खेळाडू पाठवण्यात आले. या वर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये २३ खेळाडू या स्पर्धेला पाठवण्यात आले आहेत.

जागतीक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारे खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन म्हणून संबोधले जातात. या स्पर्धा दर वर्षी होत असतात. मागील काही वर्षांपासून ज्या वर्षी ऑलम्पिक स्पर्धा असते त्यावर्षी या जागतीक बॅडमिंटन स्पर्धा होत नाहीत.

एकूणच भारतीय बॅडमिंटन खेळाडू आपला ठसा जगाच्या नकाशावर उमटवत आहेत ज्यामुळे क्रमवारीत भारतीय खेळाडू सातत्याने चमकत आहेत.