भारताचा महान फलंदाज मोहम्मद कैफ सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त

भारताच्या संघातील उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा फलंदाज मोहम्मद कैफने शुक्रवारी 13 जुलैला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.

त्याच्या या निर्णयाबद्दल त्याने बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांना ईमेलद्वारे कळविले आहे.

16 वर्षांपूर्वी 13 जुलै 2002ला लॉर्डे्सवर झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कैफने नाबाद 87 धावा करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्याची ही खेळी खूप प्रसिद्ध झाली. त्यामुळे या विजयाच्या दिवसाचे औचित्य साधून कैफने निवृत्ती घोषित केली आहे.

तसेच त्याने ट्विटरवरुनही याबद्दल माहिती दिली. त्याने ट्विटरवर एक पत्राचा फोटो टाकला आहे. ज्यात त्याने त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल सांगितले आहे आणि चाहत्यांचे, भारतीय संघाचे, सचिन तेंडूलकरचे आणि कुटुंबाचे आभार मानले आहेत.

त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा माझे भारतासाठी खेळण्याचे स्वप्न होते. मी खूप सुदैवी आहे की मला माझ्या आयुष्यातील 190 दिवस माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले. माझ्यासाठी सर्व स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्याची आज एक चांगली संधी आहे. सर्वांचे आभार”

कैफ टी20 विश्वचषक 2007च्या विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. तसेच 19 वर्षांखालील भारतीय संघाने पहिल्यांदाच जिंकलेल्या 2000 च्या विश्वचषकातही कैफचा समावेश होता. 

त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे आणि छत्तीसगढचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तो  उत्तर प्रदेशच्या संघाकडून रणजीचे विजेतेपदही जिंकला आहे.

अशी आहे कैफची क्रिकेटमधील कामगिरी:

त्याने आत्तापर्यंत भारताकडून 13 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 22 डावात 32.84 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 1 शतकाचा आणि 3 अर्धशतकाचा सामावेश आहे.

तसेच तो भारताकडून125 वनेडे सामने खेळला असुन त्यात त्याने 2 शतक आणि 17 अर्धशतकांसह 2753 धावा केल्या आहेत. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 186 सामन्यात खेळताना त्याने 38.60 च्या सरासरीने10229 धावा केल्या आहेत. यात त्याने 19 शतके आणि 59 अर्धशतके केली आहेत. तर लीस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 269 सामने खेळताना 67.68 सरासरीने 7763 धावा केल्या आहेत.

महत्त्वाची बातम्या:

-६ विकेट्स घेणारा कुलदीप यादव म्हणतो हाच संघ जिंकणार फिफा विश्वचषक

-आहे जगातील सर्वात स्फोटक खेळाडू परंतू फलंदाजीत केला नकोसा विक्रम

-सलग ७ वनडे मालिकांत ७ शतके करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव खेळाडू