माजी कॅप्टन कूल एमएस धोनीचा भारताकडून खास विक्रम

धरमशाला । येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या वनडेत जरी भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली असली तरी संघाला सन्मानजनक धावसंख्या उभी करून देण्यात माजी कर्णधार धोनी पुढे आला आहे.

त्याने आज ७८ चेंडूत अर्धशतकी खेळी करताना एक खास विक्रम केला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावा करणारा धोनी हा केवळ ६वा खेळाडू ठरला आहे.

या सामन्यापूर्वी हा विक्रम करण्यासाठी धोनीला १७ धावांची गरज होती. धोनीने ४८३ सामन्यात ४५.३२च्या सरासरीने १६०४४ धावा केल्या आहेत. श्रीलंका संघाविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच धोनीनेही ही कामगिरी केली आहे.

भारताकडून तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
३४३५७ सचिन तेंडुलकर
२४०६४ राहुल द्रविड
१८४३३ सौरव गांगुली
१६८९२ वीरेंद्र सेहवाग
१६२५४ विराट कोहली
१६०४४ एमएस धोनी
१५५९३ मोहम्मद अझरुद्दीन