बांगलादेशविरुद्ध युवराज, कोहली करणार हे अनोखे विक्रम

जेव्हा उद्या भारत बांगलादेशविरुद्ध आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उपांत्यफेरीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा तो युवराजचा ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना राहील. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड़ और मोहम्मद अजहरुद्दीन यांनी ३०० सामने खेळले आहेत.

सचिन (४६३), द्रविड(३४०), अजहरुद्दीन(३३४), गांगुली (३०८) यांनी ही कामगिरी केली आहे. यापूर्वी जगातील १८ खेळाडूंनी हा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे महान फलंदाज ब्रायन लारालाही आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ३०० सामने खेळण्याचं भाग्य लाभलं नाही. लाराने २९९ एकदिवसीय सामन्यात खेळताना १०४०५ धावा केल्या आहेत.

योगायोग
युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा चॅम्पियन्स ट्रॉफीनेच केला होता. नैरोबीला ३ ऑक्टोबर २००० रोजी युवराज आपला पहिला सामना केनिया विरुद्ध खेळाला होता. परंतु त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

याबद्दल युवराजने एक ट्विट केले असून त्यात तो त्याचे कुटुंबीय, मित्र, चाहते आणि गुरु यांचं आभार मानतो. 


कोहली ठरणार सर्वात वेगवान ८००० धावा करणारा खेळाडू
भारतीय कर्णधार विराट कोहली सर्वात वेगवान ८००० धावा करणारा खेळाडू ठरणार आहे. सध्या विराटच्या नावावर १८२ एकदिवसीय सामन्यात ७९१२ धावा असून त्यात २७ शतकांचा आणि ४१ अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने जर बांगलादेश विरुद्ध ८८ धावा केल्या तर १९० सामन्यात १८२ डावात ८००० धावा करण्याचा एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम तो ८ सामने किंवा ८ डावांनी मोडेल. तसेच डिव्हिलिअर्स गांगुली सचिन या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

यापूर्वी भारताकडून ७ फलंदाजांनी ८००० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यात सचिन (१८४२६), गांगुली(११२२१), द्रविड(१०७६८), मोहम्मद अझरुद्दीन(९३७८), धोनी(९१६३) आणि युवराज सिंग (८५३०) यांचा यात समावेश आहे. भारताच्या वीरेंद्र सेहवागचा हा विक्रम केवळ ५ धावांनी हुकला होता.