आणि विराट कोहली चिडला!

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या मुख्य फेरीचा भारताचा पुढील सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे परंतु त्यापूर्वी सरावासाठी भारताला आवश्यक सुविधा न देऊन दुजाभाव केला जात आहे.

कोणत्याही सामन्यापूर्वी खेळाडूंना सरावासाठी काही दिवस आधी मैदान किंवा जागा उपलब्ध करून दिले जाते परंतु भारतीय संघाला सरावासाठी पुरेशी जागाच दिली नसल्याचं उघड झालं आहे.

या सर्व प्रकाराला वैतागून भारतीय कर्णधार विराट कोहलीने मैदान सोडून दुसऱ्या जागेची चाचपणी केली. टीम विराटला सरावासाठी मुख्य खेळपट्टीच्या बाजूला जागा देण्यात आली. परंतु जागा अपुरी असल्यामुळे संपूर्ण टीमला सराव करणं शक्‍य होत नव्हते. पाकिस्तान संघ जेव्हा काल येथे सरावासाठी आला तेव्हा मात्र त्यांना मोठी जागा देण्यात आली होती.

याबद्दल भारतीय टीम मॅनेजमेंटने तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.