भारतीय खेळाडूंनी दिल्या अफगाणिस्तान, आयर्लंड संघांना शुभेच्छा

0 67

आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोशिएशनने आयर्लंड, अफगाणिस्तान संघांना पूर्णवेळ सदस्यत्वाचा तसेच कसोटी क्रिकेटचा खेळणाऱ्या संघांचा दर्जा दिला. आयसीसीच्या लंडन येथे सुरु असलेल्या बैठकीत अगदी शेवटच्या क्षणी हा घेण्यात आला.

या दोनही संघांना कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात दोनही देशांच्या बाजूने मतदान झाल्यामुळे आता आयसीसीच्या कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या १० वरून १२ झाली आहे.
भारतीय क्रिकेटमधील आजी माजी खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारतातील बहुतेक मोठ्या क्रीडापत्रकारांनीही हा एक चांगला निर्णय असल्याच सांगितलं आहे वेळी क्रिकेटमधील दिग्गज संघाकडून या दोन संघाना पूर्ण मदतीची अपेक्षा केली आहे.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: