टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्याचा रिपोर्ट करावा लागणार सादर- विनोद राय

लंडन। भारतीय संघाचा इंग्लंड विरुद्धचा पाचवा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू आहे. या दौऱ्याचा रिपोर्ट भारतीय संघ व्यवस्थापकाला सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समितीचे (सीओए) अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे सोपवावा लागणार आहे.

“सध्या मी त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. पण एकदा संघ व्यवस्थापकाने रिपोर्ट दिला की आम्ही त्याच्यावर पुढे निर्णय घेऊ”, असे राय म्हणाले.

भारत कसोटी मालिकेतील पहिल्या चार पैकी तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला असल्याने त्यांना ही मालिकाही गमवावी लागली आहे. यामध्ये भारताच्या फंलदाजीवर प्रश्न उपस्थित झाले आहे. तसेच भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना लवकर बाद करण्यात अपयश आले असल्याने याचेही कारण त्यांना द्यावे लागणार आहे.

सध्या  इंग्लंड या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा आघाडीवर आहे. एजबस्टनला झालेल्या पहिल्या कसोटीत १९४ धावांचा पाठलाग करताना भारताला ३१ धावांनी पराभूत व्हावे लागले.

तर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत एक डाव आणि १५९ धावा असा दारूण पराभव स्विकारावा लागला. नॉटींगघमची तिसरी कसोटी २०३ धावांनी जिंकत या मालिकेतील पहिला विजय नोंदवला.

साउथँप्टनमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली पण इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी त्यांच्या दुसऱ्या डावात उत्तम खेळत २४४ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताचा पुर्ण संघ १८४ धावांत बाद झाला. यामुळे भारताने इंग्लंडमध्ये सलग तिसरी कसोटी मालिका गमावली आहे.

सध्या सुरू असलेल्या केनिंग्टन ओव्हल मैदानावरच्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३३२ धावा केल्या असून भारताने ७ विकेट्स गमावत २४० धावा केल्या असून धावसंख्या बरोबर करण्यासाठी ९२ धावांची गरज आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला वेगवान गोलंदाज अँडरसनला झाली मोठी शिक्षा

एशिया कप २०१८साठी अशी समालोचकांची टीम